वाघोबा घाटात भीषण अपघात; एसटी बस दरीत कोसळली

पालघर मधील वाघोबा घाटात भुसावळ पालघर बसला भीषण अपघात झाला
Palghar Bus Accident
Palghar Bus AccidentSaam TV

Palghar Bus Accident : पालघरमधील (Palghar) वाघोबा घाटात (Waghoba Ghat) प्रवाशांनी भरलेल्या बसला (Bus Accident) भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दरीत कोसळली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामध्ये किमान 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Palghar Bus Accident Latest News)

Palghar Bus Accident
मिरजेच्या वड्डीत फर्माहाऊसवर छापा, अंमली पदार्थांचा साठा जप्त; पुणे सीमा शुल्क विभागाची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची भुसावळ-पालघर रातराणी बस नाशिकवरून पालघरच्या दिशेने निघाली होती. सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वाघोबा घाटात एका वळणावर बसवरील वाहन चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात उलटली. या बसमधून 20 ते 25 प्रवाशी प्रवास करीत होते. यातील किमान 15 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बस चालक मद्यपान करून भरधाव वेगानं गाडी चालवत असल्याने हा अपघात झाला असं प्रवाशांचे म्हणणे आहे.

"आम्ही कंडक्टरला सांगत होतो की चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेअरिंग देऊ नये. तरी कंडक्टरने आमचं न ऐकता चालकाची पाठराखण केली. मात्र चालक फार भयंकर पद्धतीने अगदी वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला", असा दावा या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com