Uttar Pradesh Saam TV
महाराष्ट्र

Uttar Pradesh : पोटदुखीनं त्रस्त महिला रुग्णालयात पोहोचली; ऑपरेशन करणारे डॉक्टरही हादरले

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली असता पोटातून चक्क टॉवेल बाहेर निघाला.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh: उत्तरप्रदेशमध्ये डोकं चक्रावणारी एक घटना घडली आहे. एका महिलेच्या पोटात दुखू लागल्याने ती डॉक्टरांकडे गेली असात डॉक्टरांनी तिच्या पोटातून चक्क टॉवेल बाहेर काढला आहे. या घटनेने ऑपरेशनवेळी डॉक्टर स्वत: हादरले होते. आधिच्या एका शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्याच निष्काळजीपणाने हा प्रकार घडला आहे. (Latest Uttar Pradesh News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील आहे. शमशेर अली आणि त्यांची पत्नी नझराना हे या परिसरात राहतात. प्रसूतीसाठी नझराना 'सैफी नर्सिंग होम'ध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी परवानगीशिवाय त्यांचे सिझेरियन ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन नंतर महिलेच्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या. त्यामुळे डॉ. मतलूब यांनी महिलेला उपचारासाठी आणखीन काही दिवस रुग्णालयात थांबण्यास सांगितले.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नझराना रुग्णालयातच थांबल्या. औषध उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा दिसत नव्हती. त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. बाहेर गारवा जास्त असल्याने त्यांना हा त्रास होत आहे असे डॉक्टर सांगत होते. मात्र वेदना असह्य होत असल्याने पती शमशेर अली नझराना यांना घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले.

दुससऱ्या रुग्णालयात महिलेवर व्यवस्थित उपचार करण्यात आला. डॉक्टरांनी त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शस्त्रक्रिया केली असता पोटातून चक्क टॉवेल बाहेर निघाला. डॉ. मतलूब यांनी प्रसुतीवेळी महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी त्यांनी एक टॉवेल महिलेच्या पोटात ठेवला होता, असे महिलेच्या पतीचे म्हणणे आहे. सदर घटनेचा खुलासा होताच नझराना आणि अली यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शमशेर अलीने सोशल मीडियावर या बाबत पोस्ट शेअर करत मुख्य वैद्यकीय अधिकारी राजीव सिंघल यांना या प्रकरणात न्याय मागितला आहे. यावर सिंघल यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "मला सोशल मीडियावर तुमची समस्या समजली विभाग अधिकारी डॉ. शरद यांना अधिक चौकशी करण्यास मी सांगितलं आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT