Ghazipur Boat Accident Saam TV
महाराष्ट्र

भयंकर! 25 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीपात्रात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

उत्तरप्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

गाझिपूर : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) गाझिपूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. प्रवाशांनी गच्च भरलेली बोट अचानक नदीत बुडाली. या बोटीमधून जवळपास 25 ते 27 जण प्रवास करीत होते. यामधील 6 जणांचा बुडून मृत्यू झाला असून 19 जणांना वाचवण्यात यश आलंय. अजूनही काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Uttar Pradesh Ghazipur Boat Capsize)

प्राप्त माहितीनुसार, सदरील घटना रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बचावपथकाने बोटीमधील (Boat Accident) 19 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, या घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झालीय. रेवती जिल्ह्यालाही पुराच्या पाण्याने वेढा टाकला आहे. त्यामुळे प्रशासनाने गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या बोटींची व्यवस्था करून दिली. दरम्यान, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास काही नागरिक नदीपात्र ओलांडण्यासाठी बोटीतून प्रवास करीत होते. त्यावेळी अचानक बोटीत पाणी भरण्यास सुरूवात झाली. (Boat Accident Viral Video)

दरम्यान, बोटीतील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. प्रवाशांची आरडाओरड ऐकून नदीच्या किनाऱ्यावर गर्दी जमा झाली. बघता-बघता ही संपूर्ण बोट पाण्यात बुडाली. स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात उड्या घेऊन बोटीतील 19 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. यातील 6 प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT