Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'हे राजकीय धंदे बंद करा...', योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो, संजय राऊतांनी केली जोरदार टीका

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईमधील रोड शो ला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे.

Gangappa Pujari

Mumbai: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या मुंबई दौऱ्यामध्ये ते आज ( ५, जानेवारी) ला मुंबईला रोड शो करणार आहेत. या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत, त्याचबरोबर योगी आदित्यनाथ या रोड शोच्या माध्यमातून अनेक उद्योजकांची तसेच सिने कलाकारांची भेट घेणार आहेत.

मात्र योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईमधील रोड शो ला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोध दर्शवला आहे. या संबंधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जोरदार टीका केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मुंबईमधील रोड शोवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना "योगी इथे मुंबईत कशाला रोड शो करत आहेत. आमच्याकडचे उद्योगधंदे ओरबाडून नेणार असेल तर आक्षेप आहेच. गुंतवणुकीसाठी रोड शो कशासाठी," असा सवाल करत त्यांनी जोरदार टीका केली आहे.

त्याचबरोबर "राजकीय उद्योग इथे नका करु, मुंबईतून फिल्मीसिटी घेवून जाणार आहात का? परंतु लोक तर इथे काम करतात," अशा शब्दात त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी टाकलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याचीही खिल्ली उडवली आहे.

याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी माझ्यावर अब्रु नुकसानीचा दावा अरे बापरे, अनुबॉंम्ब पडल्यासारखं वाटतंय, असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी असा केलेला उल्लेख म्हणजे त्यांच्या पोटात होत तेच ओठावर आलं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT