Jamkhed Saam
महाराष्ट्र

Crime Shocking: 'महिला आहेत, लघुशंका करू नका' तिघांना राग अनावर, हॉटेल व्यवसायिकाच्या मुलावर गोळ्या झाडल्या

Jamkhed Shooting: "इथे लघुशंका करू नका, महिला आहेत" असे सांगितल्याचा राग आल्याने तीन अज्ञातांनी दोन तरुणांवर गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Bhagyashree Kamble

लघुशंका करू नका, महिला आहेत, असं म्हटल्याचा राग आल्यानं संतापलेल्या ३ अज्ञातांनी दोन जणांवर गोळीबार केला आहे. आधी शिवीगाळ करून मारहाण केली नंतर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये घडली असून, पोलिसांनी दोघांना रूग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोकळे वस्ती परिसरात काही महिला आणि नागरिक उपस्थित होते. त्याच सुमारास एका चारचाकी वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्ती नदीकिनारी लघुशंका करत होत्या. अदित्य बबन पोकळे (वय २०) या युवकाने त्यांना तेथे लघवी करू नये, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी अदित्य पोकळे याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी कुणाल बंडू पवार (वय २०, रा. जामखेड) हा युवक तेथे आला. कुणाल पवार हा हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. कुणालने हस्तक्षेप करताच तिघांनी त्यांच्याकडील पिस्तूल काढून दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. गोळीबाराच्या घटनेनंतर त्याला तातडीने जामखेड येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील दवाखान्यात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनाची तात्काळ कारवाई

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेले असून, त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेल्या गाडीचा नंबर मिळवून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया

या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आलो आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीत राहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT