Urea Black Market In Wardha  
महाराष्ट्र

Urea Black Market: आर्वी, कारंजा तालुक्यात युरियाची साठेबाजी; १२ लाख रुपयांच्या युरिया बॅग जप्त, कृषी विभागाची कारवाई

Urea Black Market: पिकांच्या वाढीसाठी शेतकरी युरियाचा वापर करतात. युरियाला वाढती मागणी बघता शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. जिल्ह्यातील आर्वी आणि कारंजा येथे युरियाची साठेबाजी केली जात आहे.

Bharat Jadhav

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

शेतकऱ्यांना वापराकरिता असलेल्या युरियाचा अनधिकृत साठा आर्वी आणि कारंजा तालुक्यात करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने छापा टाकत तीन गोदामातून युरियाच्या १२ लाख ३५ हजार २०० रुपयांच्या ४ हजार ६३५ बॅग जप्त केल्या. शेतकऱ्यांकडून सध्याच्या काळात पिकांना युरिया देण्याकरिता मागणी होत आहे. अशात जिल्ह्यातील आर्वी आणि कारंजा तालुक्यात युरियाची साठेबाजी करत शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जातेय.

युरियाकरीता शेतकऱ्यांची फरवड होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कारंजा तालुक्यातील राजणी आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा आणि पिंपळखुटा येथील गोदामावर कृषी विभागाने छापा घातला. या तिन्ही गोदामातून ४ हजार ६३५ बॅग जप्त करण्यात आल्यात. या कारवाईत कृषी विभागाने जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

या बॅग शेतकऱ्यांना चढ्या दराने विकण्याकरिता जमा करून ठेवण्यात आल्या होत्या. का औद्यागिक वापराकरिता होत्या याचा खुलासा तपासणी अंती कळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान छापेमारीची ही कारवाई मुख्य गुणवत्ता निरीक्षक प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेची कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे यांच्या पथकाने केलीय.

आर्वी आणि कारंजा या दोन तालुक्यात तीन गोदामात अनधिकृतरित्या साठवून ठेवण्यात आलेला युरिया कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला आहे. त्याचे नमुने अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. तेथून अहवाल आल्यानंतर हा युरिया शेतकऱ्यांच्या वापराकरिता असलेला आहे की औद्योगिक वापराकरिता याचा खुलासा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा कडुलिंबाची पेस्ट, करुन बघा घरगुती उपाय

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

SCROLL FOR NEXT