Maharashtra Politics : शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार? संजय राऊत काय म्हणाले, पाहा VIDEO

Sanjay Raut On BJP MP Kangana Ranaut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगणा राणावत यांना चांगलंच घेरलं आहे. शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय.

मुंबई : भाजप खासदार कंगणा राणावतने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलंय. यामुळे आता विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. कंगणा रानावत यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक महिलांच्या हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या होत्या, असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. यावरून आता विरोधकांनी त्यांना घेरल्याचं दिसत आहे.

कंगणा रानावत यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वाद चिघळण्याची शक्यता आहे. कॉंग्रेससह विरोधी नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले, हे कंगणा राणावत यांचं वक्तव्य आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी कंगना राणावत यांच स्टेटमेंट घेतलं पाहिजे. मग त्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा करू असं म्हटलंय. परंतु कंगणा राणावत यांच्या गंभीर आरोपांमुळे आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com