Chhatrapati Shivaji Maharaj Statue Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॉरिशसमधील पुतळ्याचं अनावरण; उपमुख्यमंंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण झाले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

मॉरिशसमध्ये सुमारे 75 हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे 54 संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन केला आहे. या फेडरेशनची स्थापना 1 मे 1960 रोजीच झाली. (Latest Marathi News)

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवनसुद्धा उभारण्यात आले असून, या टप्पा-2 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी यांनी 8 मार्च 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी आपला मनोदय व्यक्त केला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार आहे. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT