BBC chairman Resigns: बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांचा राजीनामा, बोरिस जॉन्सन यांना कर्ज मिळून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप

बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांचा राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण
BBC chairman Richard Sharp resigns
BBC chairman Richard Sharp resigns Saam TV
Published On

BBC Chairman Richard Sharp Resigns : बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी नियुक्त्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा एक रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले.

याशिवाय ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris johnson) यांना कर्ज मिळून देण्यासाठी रिचर्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. ते जून अखेरपर्यंत या पदावर राहणार आहेत.  (Latest Marathi News)

BBC chairman Richard Sharp resigns
Barsu Refinery Project Protest Explainer: बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का? जाणून घ्या

बीबीसीच्या रिपोर्टनुसार शार्प (Richard Sharp) यांनी म्हटले आहे की, "मी ठरवले आहे की बीबीसीच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून आज सकाळी मी बीबीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा परराष्ट्र मंत्री आणि बोर्डाकडे दिला आहे."

शार्प यांनी स्वीकारले आहे की, त्यांनी देशातील सर्वात वरिष्ठ नागरी सेवक, कॅबिनेट सचिव सायमन केस आणि मिस्टर जॉन्सन यांचे दूरचे चुलत भाऊ सॅम ब्लिथ यांची बैठक आयोजित केली होती. ज्यांनी 2020 च्या उत्तरार्धात तत्कालीन पंतप्रधानांना आर्थिक मदत देऊ केली होती.

BBC chairman Richard Sharp resigns
Brij Bhushan Sharan Singh: कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

त्या बैठकीच्या वेळी शार्प यांनी बीबीसीच्या अध्यक्ष पदासाठी आधीच अर्ज केला होता. यासंबंधित वृत्त संडे टाइम्समने दिले होते. त्यानंतर सत्य काय आहे, हे बाहेर यावे, यासाठी लोकायुक्तांनी चौकशी समिती स्थापन केली होती. या रिपोर्टमध्ये असे आढळून आले की, शार्प यांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली होती. कारण त्यांनी पंतप्रधानांना वैयक्तिक आर्थिक बाबतीत मदत केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com