Maharashtra Unseasonal Rain Unseasonal Rain
Maharashtra Unseasonal Rain Unseasonal Rain Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain Update: राज्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, 'या' भागात गारपिटीची शक्यता!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट आहे. या पावसामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आला आहे. अशामध्ये आता शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. कारण पुढचे पाच दिवस राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 15 एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडेल.

त्याचसोबत अनेक भागांमध्ये गारपिट होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत विदर्भातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. अशामध्ये या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. तसंच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपिट देखील होत आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे द्राक्ष, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा, बाजरी, गहू, फळभाज्या आणि पालेभाज्या या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त शेतीचेच नाही तर पशुधनाचे देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.

अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे देखील नुकसान झाले आहे. तर राज्यामध्ये अवकाळी पावसामामुळे अंगावर वीज पडून आणि झाड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी मंत्र्यांकडून सुरु आहे. तर सरकारने नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT