beed news saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain: अवकाळीचा जोर, शेतकऱ्यांच्या जीवाला घोर, 'साहेब.. माझ्या शाळेच्या फीचं काय?' कांदा भिजल्यानं चिमुरडीला अश्रू अनावर

Beed Farmer: महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्याचं मोठं नुकसान आहे. बीडमध्ये कांदा पावसात भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याची आणि त्याच्या कुटुबियांची काय अवस्था झालीय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

वडिलांनी कष्टाने पिकवलेलं लाल सोनं वाचवण्यासाठी अवघ्या सहा वर्षांच्या मुलीची ही सुरु असलेली धडपड आणि डोळ्यात दाटलेले अश्रू... जमेल तेवढे कांदे वेचण्यासाठी चिमुकल्या हाताने ती आपल्या आई-वडिलांना मदत करतेय... या लेकीने काही दिवसांपूर्वीच वडिलांकडे नवी चप्पल घेण्याची मागणी केली होती आणि शेतकरी बापानेही कांदा विक्री झाल्यावर नवी चप्पल घेऊन देण्याचा लेकीला वादा केला... मात्र अवकाळी पावसानं सर्व होत्याचं नव्हतं केलं...

आष्टी तालुक्यातील शेतकरी महेश दरेकर यांच्या जवळपास 300 गोणी कांद्याचा पावसामुळे चिखल झालाय...कांदा भिजल्यानं दरेकर कुटुंबाची पाच महिन्यांची मेहनत आणि लागवडीसाठीचा 80 ते 90 हजारांचा खर्च पाण्यात गेलाय..ज्यातून उत्पन्न मिळणार होतं तो कांदाच भिजल्यानं कुटुंब हवालदिल झालंय...

रक्ताचं पाणी करून शेतकरी मेहनतीनं शेती करतो. मात्र अवकाळी पावसामुळे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, सांगली, सोलापुरमधील शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसलाय... अवकाळी पावसानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

SCROLL FOR NEXT