NCP Chief Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा राजकीय नेत्यांना फटका; थोडक्यात बोलत संपवले भाषणांचे कार्यक्रम

Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना तर नेहमीच बसतो..पण पावसाचे साईड इफेक्ट यावेळी राजकारणावरही चांगलेच पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवी मुंबईतील कार्यक्रमातही पावसाने हजेरी लावल्याने त्यांनी अवघ्या दोन मिनिटात भाषण संपवलं.

Bharat Jadhav

(प्रसाद जगताप)

Maharashtra Rain Hits Political Leaders Programs :

राज्यातल्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, धुळे, अहमदनगर, नवी मुंबई अशा अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो असतो यावेळी या अवकाळी पावसाचा फटका राजकीय पुढाऱ्यांनाही बसला. शरद पवार, राज ठाकरे यांचे नियोजित कार्यक्रम पावसामुळे रद्द करावे लागलेत.(Latest News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण सभेला शरद पवारांच्या आधी पावसाने हजेरी लावली. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत शरद पवार पावसात भिजले आणि अख्खा निवडणुकीचा निकाल बदलला. याहीवेळी तसाच काहीसा चमत्कार होतो का? असा कार्यकर्त्यांना विश्वास होता. पण यावेळी शरद पवारांनी पावसामुळे भाषण आटोपतं घेतलं. अगदी दोन मिनिटात पवारांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार आणि पाऊस कधी कोसळेल हे सांगता येत नसल्याचा चिमटा काढत मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केला. पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर तिरस टोमणा मारत नाराजी व्यक्त केली.

गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. नागरिकांना पावसातच थांबावं लागेल, म्हणून त्यांनी मुलाखत देण्यास नकार दिला.

अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना तर नेहमीच बसतो..पण पावसाचे साईड इफेक्ट यावेळी राजकारणावरही चांगलेच पहायला मिळाले. दरम्यान आज संध्याकाळी मुंबईसह ठाणे आणि नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत दादर, फोर्ट, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, सायन आणि माटुंगा परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली.

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

मालेगाव, मनमाड, चांदवडसह नाशिकच्या ग्रामीण सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. पावसामुळे आणि जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे नदीकाठावर पार्क करण्यात आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना पाण्याचा वेढा पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT