Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; रस्त्यांवर साचले पाणी

Pune news : हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. सलग चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात वादळी वारा व जोरदार पाऊस होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे

Rajesh Sonwane

पिंपरी चिंचवड : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यातच पिंपरी चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर दुपारच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 

हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. सलग चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात वादळी वारा व जोरदार पाऊस होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातच पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवडमध्ये आज दुपारच्या सुमारास देखील जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस 
आज सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. दुपारी तीन वाजता दरम्यान अचानक मुसळधार पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पहिल्याच दिवशी शहरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कामांची पोलखोल झाली आहे. संपूर्ण शहरात पाणीच पाणी साचले असून पावसाळ्यात असाच मोठा पाऊस झाला; तर संपूर्ण शहर तुंबण्याची भीती आता नागरिकांना पडली आहे.

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात
पुणे
: उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला उकाडा या पावसामुळे काहीसा कमी झाला असला तरी शेती आणि पशुधनाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून अचानक सुरु झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांची चांगली धावपळ सुरु झाली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

SCROLL FOR NEXT