Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने हवामानत बदल जाणवत आहेत. कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर बदलत्या हवामानाचा परिणाम आता पिकांवर होत आहे.
सोबतच त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यातच आता राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यात 7,8 आणि 9 एप्रील रोजी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Latest Marathi News)
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस?
लातूर, धाराशीव, नांदेड, संभाजीनगर,अहमदनगर, परभणी,बुलढाणा, जालना, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7 ते 9 एप्रीलदरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने (Rain) आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर (Farmer) अवकाळी पावसाच मोठं संकट निर्माण झालं आहे.
देशातील हवामानाची काय परिस्थिती?
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळ पासूनच पावसाळा सुरुवात झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये काल (३ एप्रिल) देखील हलका पाऊस झाला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) संपूर्ण दिल्ली, एनसीआर आणि गन्नौर, रोहतक, भिवानी (हरियाणा) बरौत, शिकारपूर, खुर्जा (उत्तर प्रदेश) आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय किठोर, गढमुक्तेश्वर, हापूर, सियाना, शिकोहाबाद, बुलंदशहर, अनूपशहर, नरोरा, जत्री, अलीगढ, कासगंज, रोहतक, खुर्जामध्ये पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.