Beed News मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दगडफेक, खळबळजनक व्हिडिओ आला समोर
महाराष्ट्र

VIDEO: मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दगडफेक, खळबळजनक व्हिडिओ आला समोर

Manoj Jarange Patil village: बीड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

जालन्यातील मातोरी गावात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांकडून ही दगडफेक करण्यात इलायची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांचं हे गाव आहे. दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही दगडफेक कोणी केली, नेमकी का करण्यात आली ही दगडफेक, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मनोज जरंगे पाटील यांच्या घराजवळ ही दगडफेक झाल्याची माहिती आहे. दगडफेक झाल्यानंतर एकच धावपळ झाली. या घाणेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घनतेत दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. तर यामध्ये काही लोक जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. चकलांबा पोलीस घटनास्थळी दखल झाले आहेत. पोलिसांकडून स्थानिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या मातोरी गावातून काही लोक जात असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. येथूल रॅली जात होती, याचवेळी येथे दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये दगडफेकीनंतर धावपळ होताना दिसत आहे. नेमकी कोणत्या कारणावरून ही दगडफेक करण्यात आली आणि कोणी केली ही दगडफेक? याचा पोलीस आता तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

SCROLL FOR NEXT