Ahmednagar Unique Marraige Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Unique Marraige: किंकाळ्यांऐवजी सनईचे सूर, स्मशानभूमीत पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा; नगरच्या जोडप्याची राज्यभरात चर्चा

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Ahmednagar News: स्मशानभूमी म्हंटल की तिथे अंत्यसंस्कार आणि दुःखाचे आवाज कानी पडतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत मंगलाष्टकांचे सूर आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण बघायला मिळालीय. स्मशानभूमीत चक्क थाटामाटात अनोखा विवाह सोहळा पार पडला असून या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

राहाता शहरातील स्मशानभूमीत गंगाधर गायकवाड हे २० वर्षांपासून स्मशानजोगी म्हणून काम करतात आणि त्याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी मयुरी ही अंत्यसंस्कार आणि आक्रोश बघत लहानची मोठी झाली. आई वडिलांना मदत करत बारावी पर्यंतचा अभ्यासही तिने इथेच केला.

एका खाजगी ठिकाणी नोकरी करत असताना तिथेच तिचे प्रेम मनोज जैस्वाल या युवकासोबत जुळले आणि दोघांनीही जातीची बंधने तोडून लग्नगाठ (Marriage) बांधण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांची परवानगी मिळाली आणि चक्क राहाता येथील स्मशानभूमीत हा आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. ज्या ठिकाणी इतरांच्या आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणी मयुरी आणि मनोज यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केलीय. (Ahmednagar News)

मयुरी आणि मनोज यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त स्मशानभूमीत सनईचे सूर निनादले, मांडव सजला आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण झाली. माजी नगराध्यक्षा ममता पिपाड आणि त्यांचे पती राजेंद्र पिपाडा यांनी दातृत्व दाखवत नव दाम्पत्याला संसारोपयोगी साहित्य भेट देत कन्यादानाची जबाबदारी पार पाडली.

मयुरी आणि मनोज यांना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईकांसह राहाता शहरातील नागरिकही उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी स्वतः मंगलाष्टके म्हणत हा विवाह सोहळा पार पाडला.

मयूर आणि मनोज यांच्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अंधश्रद्धेला मुठमाती देत स्मशानभूमीत पार पडलेला हा आंतरजातीय विवाह सोहळा इतरांनाही प्रेरणा देणारा ठरलाय एव्हढं मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT