Ramdas Athawale  Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale News: 'इंडिया' आघाडीचा आम्हाला नाही बसला धसका, कारण...'; रामदास आठवले यांची खास शैलीत विरोधकांवर टीका

Ramdas Athawale News In Marathi : 'इंडिया आघाडीचा आम्हाला नाही बसला धसका, कारण त्यांचा बार आहे फुसका, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Ramdas Athawale Latest News In Marthi :

मुंबईत विरोधकांच्या 'इंडिया'आघाडीची आज तिसरी बैठक पार पडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी 'इंडिया' आघाडी निर्माण केली आहे. विरोधकांच्या या आघाडीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे.

'इंडिया आघाडीचा आम्हाला नाही बसला धसका, कारण त्यांचा बार आहे फुसका, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. आठवले यांनी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मारहाण झालेल्या तरुणांची भेट घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन या तरुणांची विचारपूस केली. तसेच त्यांनी जखमींना प्रत्येकी दहा हजारांची मदत दिली.

श्रीरामपूर युवकांना मारहाण प्रकरणावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'हरेगाव हे क्रांतिकारी गाव आहे. तिथे कामगार आहेत. कबुतर चोरीच्या संशयावरून त्यांना उलटं टांगून मारण्यात आले आहे. अमानुष मारहाण केली, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आम्ही निषेध केला आहे.

'या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण मुख्य आरोपी पकडलं नाही. नाना गलांडे फरार आहे. मराठा समाजाचे हे लोक नाहीत. त्यामुळे अनुसूचित जाती आणि मराठा असा वाद नाही. मराठा आरक्षणाची तर आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

'वन नेशन-वन इलेक्शन' यावरही आठवलेंनी भाष्य केलं. आठवले म्हणाले, 'ती भूमिका संविधानाने मान्य केली आहे. संविधान लागू झाले, तेव्हा सुद्धा अशा निवडणुका झाल्या आहेत. खर्च वाचवायचा असेल आणि विकास करायचा असेल तर ही भूमिका योग्य आहे. मोदींच्या या भूमिकेला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे. अधिवेशन बोलावलं आहे त्यात बिल येणं शक्य आहे. मी सदर बिलाला राज्यसभेत आल्यानंतर पाठिंबा देईल'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकसभा निवडणूक लढण्याची विनंती संजय काकडेंनी पत्र लिहून केली आहे. यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, अनेक ठिकाणी मागणी होईल. उत्तर प्रदेशमधून ते खासदार आहेत. पण ते येणार नाहीत, बनारसमध्येच उभे राहतील. इथे आले नाहीतरी फायदा होईल'.

दरम्यान, रामदास आठवले हे शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. याविषयी भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, 'मी 2009ला हरलो होतो. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोललो आहे. संधी मिळाली तर मी इच्छूक आहे. नाही मिळाली तर राज्यसभा आहे. मी २०२६ पर्यंत आहेच. मी निवडून येऊ शकतो. मी या भागातील लोकांचा विकास करू शकतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT