Onion Issue saam Tv
महाराष्ट्र

Onion Issue: केंद्रीय मंत्री गोयल यांच्या बैठकीनंतरही कांदा प्रश्नावर तोडगा नाहीच; दिल्लीत सुटणार कांदा प्रश्न?

Onion Issue: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Onion Issue:

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ही बैठक मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात झाली. परंतु या बैठकीत अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली. (Latest News)

दिल्ली येथील बैठकीस राज्य मंत्रिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू ठेवावा असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि 'एनसीसीएफ' यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केलीय.

कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकवर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी केले आहे.

केंद्र शासनाने नाफेड आणि ‘एनसीसीएफ’मार्फत २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दराने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला. या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघानां फायद्याचा ठरला. परंतु नाफेड आणि ‘एनसीसीएफ’मार्फत खरेदी केलेला कांदा इतर राज्यातील खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात मिळत होता. यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांनाही त्यांचा कांदा खरेदीपेक्षा कमी दरात विकावा लागत होता. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते. यामुळे व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद केले होते.

या बंदचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी मंत्रालयात आणि संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे सलग दोन बैठका घेतल्या आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सकाळी मंत्रालयात कांदा व्यापाऱ्यांसोबत आयोजित बैठकीतूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून याप्रश्नी तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली.

या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत, संध्याकाळीच कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन याप्रश्नी तात्काळ तोडगा काढण्याची तयारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दाखवली. दरम्यान या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही. तोडगा निघेपर्यंत कांदा खरेदी व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केंद्रीय पीयुष गोयल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्याची बैठक आज बोलवली होती. आज झालेल्या बैठकीमध्ये सर्व विषयांवर चर्चा झाली मात्र तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात पुन्हा दिल्ली येथे 29 तारखेला बैठक पार पडणार आहेभाव हा कमी जास्त होत असतो पियुष गोल यांनी आम्हाला आश्वासन दिला आहे की, भावा संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.

केंद्रीय सचिव या बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून या बैठकीला काही ठोस निर्णय घेता आला नाही. तीन दिवसाच्या आत मार्केट कमिटीच्या जे काही समस्या आहेत त्या संदर्भात राज्य सरकार या संदर्भात निर्णय घेतील तीन दिवसाच्या आत मार्केट कमिटीच्या जे काही समस्या आहेत त्या संदर्भात राज्य सरकार या संदर्भात निर्णय घेईल,अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT