Nagpur Sakkardara News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली नकळत तोंडात घातली; दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली नकळत तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

संजय डाफ

Nagpur News : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली नकळत तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (१३ फेब्रुवारी) शहरातील सक्करदरा परिसरात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  (Latest Marathi News)

रिद्धी दिनेश चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रिद्धीचे वडील दिनेश चौधरी यांचे औषधालय असून ते त्यावरील मजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतात. चौधरी यांना दोन मुली आहेत.रिद्धी ही सर्वात लहान मुलगी असून ती रविवारी दुपारच्या सुमारास बेडरुममध्ये खेळत होती.

दरम्यान, खेळता खेळात रिद्धीच्या हाती मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली लागली. नकळत तिने ही बाटली तोंडात घातल्याने ती बेशुद्ध पडली. तासाभराने रिद्धीची आई बेडरुममध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर वडिलांनी रिद्धीला रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर रिद्धीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT