Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar : शॉर्ट टर्म व्हिसावर नातेवाईकांना भेटण्यासाठी येत झाले स्थायिक; उल्हासनगरमधून १७ पाकिस्तानींना पाठवलं परत

Ulhasnagar News : पाकिस्तानी नागरिक आजही लॉंग टर्म व्हिसावर उल्हासनगरमध्ये वास्तव्याला असून व्यापार, उद्योग करत आहेत. नातेवाईकांना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन उल्हासनगरमध्ये वास्तव्यास राहत आहेत

Rajesh Sonwane

अजय दुधाने/ अभिजित देशमुख

उल्हासनगर/ कल्याण : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कारवाई केली जात आहे. दरम्यान शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असताना पाकिस्तानी नागरिक येथेच स्थायिक झाले होते. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातून अशा १७ पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. तर कल्याण- डोंबिवलीमधून ६ बांग्लादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर हे फाळणीनंतर भारतात आलेल्या सिंधी बांधवांसाठी वसवण्यात आलेले शहर आहे. तर इथल्या सिंधी नागरिकांचे अनेक नातेवाईक हे आजही पाकिस्तानमध्ये आहेत. तर काही पाकिस्तानी नागरिक आजही लॉंग टर्म व्हिसावर उल्हासनगरमध्ये वास्तव्याला असून ते व्यापार, उद्योग, धंदा करत आहेत. येथे वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन उल्हासनगरमध्ये वास्तव्यास राहत आहेत. 

शॉर्ट टर्म व्हिसावर आले भारतात  

पहलगाम येथे मागील आठवड्यात झालेल्या हल्ल्यानंतर शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात वास्तव्याला असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार अशा पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान भारत भेटीसाठी आलेल्या १७ पाकिस्तानी नागरिकांना उल्हासनगरमधून पुन्हा एकदा पाकिस्तानात पाठवण्यात आले असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीत ६ बांगलादेशी अटकेत

कल्याण : पहलगाम हल्ल्यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. कल्याण परिमंडळ तीनमधील ६ बांग्लादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. तर मागील चार महिन्याच्या कालावधीत ३६ बांग्लादेशीवर कारवाई करत त्यांच्याविरोधात १७ केस दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

सीमेवर सोडल्यानंतर पुन्हा परततात भारतात 

कल्याण- डोंबिवली शहरात बनावट कागदपत्राच्या आधारे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या बांगलादेशींची धरपकड करत त्यांना कारागृहात डांबले जाते आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची बांग्लादेशात पाठवणी केली जाते. मात्र सीमेवर सोडण्यासाठी गेलेले पोलिस कर्मचारी परत येण्याआधीच हे बांगलादेशी नागरिक परतून येत असतात. दरम्यान कल्याण परिमंडळ तीनच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या धरपकडीत कल्याणच्या महात्मा फुले, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक तसेच डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन अशा एकूण ६ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT