Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : महिला रस्त्यानं जात होती, इतक्यात तिघे जण जवळ आले अन्...दिवसाढवळ्या घडली थरारक घटना

Ulhasnagar News : रस्त्यात एक अनोळखी व्यक्ती भेटला आणि शालिनी याना त्या ठिकाणी साड्या वाटप करत आहेत, तुम्हाला भेटली का? अशी बतावणी करून अनोळखी जागेवर महिलेला घेऊन गेले

अजय दुधाणे

उल्हासनगर : घराजवळ येऊन वेगवेगळ्या कारणांनी महिलांना गंडविण्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला असून यात एका ५५ वर्षीय महिलेस रस्त्यात गाठून तिघांनी साडीचे आमिष दाखवून सोन्याने दागिने लुटून नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) ओटी चौकात हि घटना घडली आहे. या प्रकारात शालिनी सर्जेराव कांबळे (वय ५५) या महिलेची फसवणूक झाली आहे. उल्हासनगर कॅम्प नं.3  ओटी सेक्शन चौकात दुपारी औषध खरेदीसाठी गेले होते. यावेळी रस्त्यात एक अनोळखी व्यक्ती भेटला आणि शालिनी याना त्या ठिकाणी साड्या वाटप करत आहेत, तुम्हाला भेटली का? अशी बतावणी करून अनोळखी जागेवर महिलेला घेऊन गेले. त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच त्याचे दोन साथीदार उभे होते. त्यांनी देखील महिलेला सांगितलं की आमच्या शेठला मुलगा झालाय त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि तुम्हाला साड्या आणि पैसे देतील अशी बोलणी केली. 

तसेच शेठला तुम्ही गरीब दिसायला पाहिजे म्हणून आजीच्या अंगावरील दोन तोळे सोने पर्समध्ये काढून ठेवण्यासाठी सांगितले. त्यानुसार कानातले कर्णफुल, गळ्यातले मंगळसूत्र, अंगठी आणि मोबाईल एका रुमालात काढले. (Crime News) दागिन्यांचा रुमाल असलेला मुद्देमाल घेऊन तीघेजण तेथून पसार झाले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT