ujani dam water storage 63 tmc in jan  saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam Water Level : 'उजनी'ने चिंता वाढवली, सोलापूर महापालिकेला दुबार पंपिंगचा सामना करावा लागणार

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले जात आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

गेल्या दहा वर्षांनंतर उजनी (ujani dam) जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. साेलापूरकरांना पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. (Maharashtra News)

यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पाणी पातळी खाली जाऊ शकते. १२ फेब्रुवारीनंतर महिनाभर कोणत्याही योजनेतून पाणी सोडण्यात येणार नाही. त्यानंतर मार्च आणि मे महिन्यात सोलापूर शहरासाठी १० टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

सोलापूरसाठी पहिली पाळी मार्च आणि दुसरी पाणी पाळी मे महिन्यात अशा दोन पाळ्यांत १० टीएमसी लागणार आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन ५ ते ६ टीएमसी कमी होत असते. आषाढी वारीसाठी आणि सोलापूर शहराला पिण्यास एक अतिरिक्त पाणी पाळी सोडली जाऊ शकते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी ५ टीएमसी पाणी सोडले जाऊ शकते. उजनी धरण वजा ३५ टक्क्यांपर्यंत खाली गेल्यास सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलला पाणी कमी पडते. यासाठी महापालिकेला दुबार पंपिंगचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: . भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध – छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT