Solapur Water Supply News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Water Supply News: सोलापूरातील पाणीकपात थांबणार? उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये

Solapur Water Supply News Today: १ आँगस्ट रोजी सकाळी ०६ वाजता मायनसमधून प्लसमध्ये आले आहे.

मंगेश कचरे

Ujjain Dam Water Level: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले उजनी धरण हे आज मंगळवारी दिनांक १ आँगस्ट रोजी सकाळी ०६ वाजता मायनसमधून प्लसमध्ये आले आहे. त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच काही अंशी दिलासा मिळाला आहे.(Latest Ujjain Dam Water Level)

मात्र उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ५४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. ०१ आँगस्ट रोजी उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ६३.६९ टीएमसी झाल्याने उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. गतवर्षी याच दिवशी उजनीत जवळपास १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यामानाने आज उजनीत ४२ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे.आज ०१ आँगस्ट रोजी उजनी धरणातील पाणीसाठा हा प्लसमध्ये आला असून उजनीत ६३.६९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

१८ ते ०१ आँगस्ट या चौदा दिवसांत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १८.५२ टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून उजनी जलाशयात 12255 क्युसेक्स इतक्या दाबाने पाणी येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

SCROLL FOR NEXT