Jalgaon News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची जाहीर सभा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होत आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या पाचोरा शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. या सभेपूर्वीच ठाकरे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे..
तत्पुर्वी सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही घणाघात केल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)
काय म्हणाल्या सुषमा अंधारे...
पाचगावच्या सभेत बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खारघर दुर्घटनेवरुन केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. याबद्दल बोलताना त्यांनी "कोरोना काळातही अनेक मृत्यू झाले होते. मग तेव्हा देखील अनेकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे झाले. मग कोरोना काळात उत्तर प्रदेशात गंगा नदीवर प्रेत तरंगले तेव्हा तुम्ही का बोलले नाही," असा थेट सवाल राज ठाकरेंना विचारला.
यावेळी नवनीत राणांवर टीका करताना नवनीत राणांना नीट हनुमान चालिसाही म्हणता येत नाही. काही वेळापूर्वी सभेत आमचा कार्यकर्ता अगदी भरभर हनुमान चालिसा म्हणत होता, त्यामुळे राणांनी त्याच्याकडे हनुमान चालिसाची ट्यूशन लावावी, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तसेच यावेळी शिंदे गटावर निशाणा साधताना "शिंदे गटाचं हिंदुत्व बेगडी हिंदुत्व आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्था आहे. या अस्वस्थेमुळे काही लोक वाटेत ते बोलू लागले. त्यांची विधाने हिंदुत्वाचं बेगडीपण दाखव होती. त्यातच गुजरातमधील वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीने अस्वस्थता आणखी वाढवली होती, असेही त्या यावेळी म्हणाल्या.. (Maharashtra Politics)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.