साहित्य संमलेनाला जायचंय? सादर करावी लागणार शारीरिक तंदुरुस्ती! SaamTVnews
महाराष्ट्र

साहित्य संमलेनाला जायचंय? सादर करावी लागणार शारीरिक तंदुरुस्ती!

उदगीर येथे २२ एप्रिलपासून आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांना आपल्या तब्येतीची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्यातील निर्बंध हटविण्यात आले असले, तरीही संसर्गाचे पडसाद अद्याप उमटताना दिसत आहेत. उदगीर येथे २२ एप्रिलपासून आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Udgir Sahitya Sammelan) येणाऱ्या रसिकांना आपल्या तब्येतीची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. सहभागी होणाऱ्यांना विशिष्ट अर्ज भरून द्यावा लागणार आहे. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच मेडिकल फिटनेस (Medical Fitness) सादर करण्याचे बंधन घालण्यात आले असल्याची माहिती रामचंद्र तिरुके यांनी दिली आहे.

हे देखील पहा :

उदगीर (Udgir) येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला (Sahitya Sammelan) उपस्थित राहणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसह साहित्यिकांची आरोग्यविषयक माहिती मागविण्यात आली आहे. त्यामध्ये रक्तगट, उच्च रक्तदाब, हृदयासंबंधीचे आजार, मधुमेह, ऑक्सिजनची पातळी आदी माहितीचा समावेश आहे. या शिवाय अॅलर्जी, कोरोना प्रतिबंधक लसीकरण बूस्टर डोस घेतला आहे का, अशीही माहिती द्यावी लागणार आहे. फॅमिली डॉक्टरांचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांक, सध्या घेत असलेली औषधे आणि अन्य आरोग्यविषयक तक्रारींचीही नोंद घेतली जाणार आहे.

कोरोनाची (Corona) तिसरी लाट नुकतीच ओसरली आहे. या पार्श्वभूमीवर उदगीरच्या संमेलनाच्या आयोजकांनी प्रत्येक सहभागी व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती विचारली आहे. उदगीर परिसरात सध्या कडक उन्हाळा आहे. ऐन उन्हाळ्यात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाचा साहित्यिकांना त्रास झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जावे, हा त्यामागील उद्देश असल्याचे रामचंद्र तिरूके सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT