Uddhav Thackreay 
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मनातील चिंता, म्हणाले...

Siddharth Latkar

सांगली : काेराेनाचे संकट हे दबा धरुन बसले आहे. या परिसराची मला आज पुन्हा चिंता वाटू लागली आहे. यामुळे या भागात तपासण्या वाढवा अशी सूचना प्रशासनास दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे नमूद केले. (uddhav-thackreay-orders-to-increase-covid19-testing-of-citizens-sangli-satara-sml80)

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे आज (साेमवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले हाेते. भिलवडी, अंकलखाेप, डिग्रज, सांगली शहरातील विविध भागात पाहणी करुन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत देण्यास प्रारंभ झाला आहे. घाेषणा करण्याने काेणाचे पाेट भरले जाणार नाही. प्रत्यक्ष काम केल्याने भरणार आहे या मताचा मी आहे. आम्ही केंद्राकडे तीन गाेष्टींची अपेक्षा व्यक्त केली आहे. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज आहे. त्याबाबत मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र माेदींशी बाेललाे आहे असेही मुख्यमंत्री ठाकरेंनी नमूद केले.

ते म्हणाले, ज्या व्यापा-यांनी, दुकानदारांनी विमा काढला आहे त्याचे निकष म्हणजेच त्याची खातरजमा केल्यानंतर कंपनी त्यांना पैसे देणार आहे. त्यास विलंब हाेत असल्याने तात्काळ विम्याची रक्कम द्यावी असे विमा कंपन्यांना सांगितले आहे. केंद्राची सूचना आल्यानंतर कार्यवाही करु असे आश्वासन विमा कंपन्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले.

याबराेबरच बॅंकांनी नवीन कर्ज देताना कमी व्याजदराने द्यावे असे आवाहन बॅंकांना केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

सातारा, सांगली, काेल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, रायगड या भागात अतिवृष्टीची आपत्ती येण्यापुर्वी काेराेनाचे सावट हाेते आणि आत्ता देखील आहे. काेराेनाची रुग्ण संख्या इथं कमी हाेत नाहीये. ते का हाेत नाहीये याचा अभ्यास करतानाच अतिवृष्टीचे संकट आले.

काेराेनाचे संकट हे दबा धरुन बसले आहे. या परिसराची मला आज पुन्हा चिंता वाटू लागली आहे. यामुळे या भागात तपासण्या वाढवा अशी सूचना प्रशासनास दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. आराेग्य पथक वाढवा काेणालाही काेणता ही राेग हाेऊ देऊ नका अशी सूचना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान राज्यातील दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठीचा आदेश काढला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT