Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरु राहणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत

Siddharth Latkar

सांगली : काेविड १९ रुग्ण संख्या कमी असलेल्या राज्यातील जिल्ह्यांत रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय आज (साेमवार) घेतला जाईल असे सूताेवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील दाैरा पुर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दुकानांसाठी वेळ वाढवून देऊ असे स्पष्ट केले. (uddhav-thackreay-addressed-media-lockdown-norms-maharashtra-sangli-sml80)

स्थानिक व्यापा-यांनी आम्हांला दुकाने सुरु करण्यासाठी परवनागी द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले मी अशा धमक्यांना मनावर घेत नाही असे स्पष्ट करुन जेथे शिथिलता द्यायची आहे तेथे दिले जाईल. आम्हांला काेणाचा जीव धाेक्यात घालयचा नाही असे नमूद केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ज्या जिल्ह्यात काेविड १९ ची रुग्ण संख्या जास्त आहे. तेथे आम्ही काेणत्याही प्रकारची शिथिलता देणार नाही. ज्या भागात बंधने पाळली जात नाही तेथे रुग्ण वाढतात असे आढळून आले आहे. ज्या भागात शिथिलता देणे शक्य आहे तेथे दिल्या जात आहेत.

राज्यातील दुकानांच्या वेळा रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेत आहाेत. परंतु ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी हाेत नाही त्या जिल्ह्यात बंधने कायम राहतील. तेथील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT