परभणी ः परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर निवृत्त झाले. त्यांच्या जागी आंचल गोयल यांची राज्य शासनाकडून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर त्यांना सरकारने पुन्हा मुंबईला बोलावून घेतले आहे. आता अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. दोनच दिवसांत जिल्हाधिकारी का नकोसे वाटले, अशी चर्चा आता परभणीत रंगलीय. काही नागरिकांनी या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलनही सुरू केलंय.
खरंतर आंचल गोयल या परभणी जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाल्या होत्या. मात्र, पालकमंत्री नवाब मलिक आले असता कुठल्याही कार्यक्रमात अंचल गोयल या उपस्थित राहिल्या नाही. त्याच कारणातून आंचल गोयल यांच्या बदलीच्या हालचाली पडद्यामागे सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच अखेर आंचल गोयल यांना राज्य सरकारने तातडीने परत मुंबईला बोलावले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपविला.
गोयल या धडाडीच्या अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या दबावापोटी अखेर सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केली. दरम्यान आज मुंगळीकरांच्या निवृत्तीनंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मात्र, आंचल गोयल यांच्या जागी आता परभणी जिल्हाधिकारी म्हणून कोण येते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे
कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी असल्याने आंचल गोयल यांची नियुक्ती होऊन ती रद्द करण्यात आली. राज्यातील अधिकाऱ्यांनी नेमकं काम करावं कसं असा प्रश्न एकूण घडामोडीनंतर उपस्थित झाला आहे. या प्रकाराने परभणीकर संतप्त झाले आहेत. परभणीकरांना सक्षम जिल्हाधिकारी पाहिजेत जिल्हा वसुली अधिकारी नकोत. यासाठी जागरूक नागरिक आघाडीच्या वतीने आंदोलन केले जात आहे.
आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हप्तेवसुली करणारा अधिकारी नको. भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शेतकरी नेते माणिक कदम, कामगार नेते राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणीकरांनी आंदोलन सुरू केले आहे.
Edited By - Ashok Nimbalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.