Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, २०२४ नंतर केंद्रासह राज्यात मोठा बदल; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Mumbra News: उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स पोलिसांसमोर फाडण्यात आलेत. आम्हाला आडवून दाखवा, असं आव्हान संजय राऊतांनी केलंय.

Ruchika Jadhav

Sanjay Raut News:

ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे आम्ही ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. मुंब्रा ठाण्याचा आणि महाराष्ट्राचा भाग आहे. शाखेवर बुलडोजर फिरवायला कोणी सांगितले? उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि २०२४ नंतर ते परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत हे विसरू नका, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज मुंब्रा येथील शाखेची पाहणी करण्याकरिता उद्धव ठाकरे येणार आहेत. याच शाखेवरून शिंदे गट अणि ठाकरे गट यांच्यात वाद झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर काही अनोळखी व्यक्तींनी फाडले आहेत. त्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे यांना मुंब्रा्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केलाय. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाणे ग्रामीण परिसरात दहशत पसरवली आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स पोलिसांसमोर फाडण्यात आलेत. आम्हाला आडवून दाखवा, असं आव्हान संजय राऊतांनी केलंय.

महाराष्ट्रात आनंदाच्या दिवाळीत मिठाचा खडा पोलिसांना टाकायचाय का?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे. जे पोलीस आज आम्हाला आडवण्यासाठी हजारोंच्या संख्येने कामाला लागलेत, ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवताना कुठे होते. पोलीस कुणाची गुलामगिरी करतायत?, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

२०२४ नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार

आज ज्यांची तुम्ही चाकरी करताय ते मालक ३१ डिसेंबरला सत्तेत राहणार नाहीत, असं सूचक वक्तव्य राऊतांनी यावेळी केलंय. राज्यात बदल होणार आहे. २०२४ नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार आहे. त्यामुळे आता आम्हाला त्रास देणाऱ्यांचे तेव्हा काय होणार याचा विचार करा, असं राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

Maharashtra Exit Poll : काँग्रेसचा गड अपक्ष भेदणार? एक्झिट पोलच्या अंदाज काय?

Sachin Shinde : भाजपला धक्का! सचिन शिंदे मशाल हाती घेणार | Marathi News

Maharashtra Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, चंद्रकांत पाटील संभाव्य आमदार? VIDEO

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली; अवघ्या १५० रन्समध्ये खुर्दा

SCROLL FOR NEXT