Uddhav Thackeray, Pune, Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

मनोहर जोशींना हटवून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं; सेनेच्या माजी मंत्र्यांच्या गौप्यस्फोट

शरद पवारांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा दावा देखील त्यांनी खोडून काढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याच राजकारण शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बऱ्यापैकी बदललं आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत शिवसेनेत (Shiivsena) बंडखोरी करणारने अनेक नेते आता उघडपणे त्यांच्याविरोधात बोलू लागले आहेत. यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले आहेत.

राज्यातील 1995 सालच्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा दावा सुरेश नवले यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या मुद्दवर चर्चा रंगू लागली याहे. ते बीडमध्ये बोलत होते.

शरद पवारांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा दावा देखील त्यांनी खोडून काढला आहे.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा दाखवायचा चेहरा एक आणि आतला चेहरा वेगळा आहे. 1998 मध्ये माझ्या घरावर हल्ला झाला त्याचे मुख्य सूत्रधार देखील उद्धव ठाकरेच आहेत, असा गंभीर आरोप देखील यावेळी सुरेश नवले यांनी केला.

शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले आहेत. याचदरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते ,माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एक जुना व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT