DELIMITATION BILL saam tv
महाराष्ट्र

डिलिमीटेशन विधेयकावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांनाही केलं मोठं आवाहन

Delimitation Row: डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करत त्यांनी शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांना विधेयकाविरोधात भूमिका घेण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या विधेयकाला जोरदार विरोध केला. सत्ताधारी पक्षाला आपल्या सोयीनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करायची असून, कोणाला किती मतं पडतात याची यादीही त्यांच्याकडे तयार असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होणार असल्याची चर्चा असताना उत्तर प्रदेशातील जागा ८० वरून १२० होणार आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील जागांच्या संख्येतील फरक ३२ वरून ४८ पर्यंत जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच तामिळनाडूमध्ये सध्या असलेल्या ३९ जागा वाढून ५९ होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी एम. के. स्टॅलिन यांनीही या विधेयकाला विरोध करावा, असं आवाहन केलं.

या विधेयकाच्या विरोधात ठाकरे गटाने त्यांच्या नऊ खासदारांना पक्षादेश दिला असून, सर्व खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान करावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. आज खोके घ्याल, पण उद्या कोपऱ्यात असाल, असा इशाराही त्यांनी दिला. जे खासदार ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेय त्यांना देखील व्हीप बजावला असल्याचे ते म्हणाले.

मतदारसंघांच्या फेररचनेवर आक्षेप घेताना, सध्याच्या खासदारांना विकासनिधी वाढवून देण्याचा पर्यायही उद्धव ठाकरेंनी सुचवला. खासदारांचा विकासनिधी पाच कोटींवरून दहा कोटी रुपये करावा, मात्र मतदारसंघांची फेररचना करून राजकीय गणितं बदलू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊन एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचं नुकसान करत असल्याचा आरोप करत त्यांनी स्टॅलिन यांनी या विधेयकाला विरोध करावा, असं म्हटलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशाच्या हिताचा विचार करून या विधेयकाबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तसेच शरद पवार यांना भेटण्यासाठी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळासोबत आदित्य ठाकरे जाणार असून शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways : आरामदायी बेड, ऑटोमॉटिक डोअर..; वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट एसी डबा पारंपरिक फर्स्ट एसीपेक्षा किती वेगळा?

Maharashtra News Live Update: शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर ही खाजगी फायनान्स कडून वसुलीसाठी तगादा

Political News : महिला IAS अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अटक; 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Overnight Phone Charging: रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवणं योग्य की अयोग्य? बॅटरीवर होतो हा परिणाम!

House Cleaning Tips : जुन्या मोज्यांना फेकून देऊ नका! फरशीवरील केस अन् धूळ साफ करण्याची भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT