Uddhav Thackeray SaamTV
महाराष्ट्र

"कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त असल्याने उद्धव ठाकरेंना मानेच दुखणं सुरु झालं"

'MVA सरकार आलं तेव्हापासून राज्यात घोटाळेबाज मंत्र्यांचे आतापर्यंत मी 28 घोटाळे बाहेर काढले असून येत्या 31 डिसेंम्बर पर्यंत मी सरकार मधील 40 चोर बाहेर काढणार.'

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray government) आलं तेव्हापासून राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांचे आतापर्यंत मी 28 घोटाळे बाहेर काढले असून येत्या 31 डिसेंम्बर पर्यंत मी या अलिबाबा चाळीस चोर सरकार मधील 40 चोर बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी बुलढान्यात केलं आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज बुलढाणा अर्बन मुख्यालयात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर मोठा हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray started having neck pain as he was busy counting money during Corona period)

हे देखील पहा -

उद्धव ठाकरे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेच दुखणं सुरू झालं असा टोला लगावतच ठाकरे लवकर बरे होवोत अशा सदिच्छा देखील सोमय्या यांनी यावेळी दिल्या.

अशोक चव्हाणांच्या Ashok Chavhan साखर कारखाण्यासंबंधी कर्जाच्या प्रकरणाच्या माहिती घेण्यासाठी आज मी आलो चौकशी केली. लातूर जिल्हा बँकेच्या (Latur District Bank) संबंधी अमित देशमुखांची Amit Deshmukh आम्ही ED कडे तक्रार केली असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय अमित देशमुख , अशोक चव्हाण, अर्जुन खोतकर, नवाब मलिक, Nawab Malik एक एक चौकशी सुरू आहे पुढे बघू. आम्हाला राज्यातील सर्व पोलिटिकल करप्शन संपवायचं आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त (Maharashtra is corruption free) करायचं आहे. असही सोमय्या म्हणाले. तसेच 'किरीट सोमय्याला घाबरवता येत नाही, अर्धा डझन मंत्री जेल मध्ये गेले. अजून एक डझन जेल मध्ये जाणार... माझ्या विरुद्ध अनेक तक्रारी महाविकास आघाडी करीत आहे त्याला किरीट सोमय्या घाबरत नाही.' असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT