Uddhav Thackeray Banner in dombivali saam tv
महाराष्ट्र

दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंची तोफ धडाडणार, 'त्या' बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण

दसरा मेळाव्या आधीच राजकीय वर्तुळातून खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : अवघ्या तीन दिवसांनंतर दसऱ्याचा सण होऊ घातला असतानाच राजकीय वर्तुळातून खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाला या धमकीबाबत माहिती मिळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बॅनरबाजीचं शीतयुद्ध सुरु झालं आहे. (Uddhav Thackeray banner for dasara melava latest news update)

मुंबईपासून विविध शहरांच्या गल्ल्यांमध्ये दोन्ही गटाचे बॅनर झळकत आहेत. अशातच डोंबिवलीतही ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बॅनरने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, बुधवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या बॅनरवर दसरा मेळावा, चलो शिवतीर्थ अशाप्रकारे शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या बॅनरवर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकेर यांच्यासोबत तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंची तोफ धडाडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बुधवारी ठाकरे गट आणि शिंदे गट दसरा मेळावा घेणार आहेत. शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.या दसऱ्या मेळाव्यात ठाकरे गट आणि शिंदे गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे डोंबिवलीत दोन्ही गटांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली असून ठाकरे गटाच्या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे.

कारण बॅनरवर तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.त्यामुळे दसऱ्याला शिवसेनेत तेजस ठाकरे यांचे लॉचिंग होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे बॅनर डोंबिवलीत झळकले असून या बॅनरमध्ये राजमुद्रेच्या आकार (षटकोन)आणि त्यात धनुष्यबाण दाखविण्यात आले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT