Uddhav Thackeray latest statement  साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : मोदी नवीन स्वामी झाले आहेत का? उद्धव ठाकरेंचा थेट हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray latest statement : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी नवीन स्वामी झाले आहेत का?' असा सवाल करत ठाकरेंनी केला.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray attacks Narendra Modi over Eknath Shinde meeting : "पंतप्रधान नरेंद्र मोदी गद्दारांना 'भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे' असे सांगत आहेत. मोदी हे नवीन 'स्वामी' झाले आहेत का?" अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. " पण या गद्दारांचा गद्दारीचा डाग कधी पुसला जाणार?" असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "मोदींनी विद्यार्थ्यांना भेटायला हवं होतं आणि त्यांना 'मी तुमच्या पाठीशी आहे' असं सांगायला हवं होतं. एका मोठ्या भावाप्रमाणे किंवा आजोबांप्रमाणे मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला हवा होता. पण त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही. मात्र, या गद्दारांना भेटून ते 'मी तुमच्या पाठीशी आहे' असं सांगत आहेत. एवढंच नाही, तर मोदींना संसदेत यायलाही वेळ नाही, पण यांना भेटायला मात्र वेळ आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.

" 'भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे' असं ते गद्दारांना सांगत आहेत. पण हा धमकीवजा संदेश नेमका कोणासाठी आहे? सुप्रीम कोर्ट, अमित शाह की देवेंद्र फडणवीस? हे समजायला हवं," असे ठाकरे म्हणाले. तसेच अमित शाह महाराष्ट्रात असताना एकनाथ शिंदे तिकडे दिल्लीत मोदींना भेटायला गेले, यावरूनही ठाकरेंनी निशाणा साधला.

"सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिंदे टेन्शनमध्ये आहेत, म्हणूनच तुम्ही या गद्दारांना भेटत आहात का? लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय दिला आहे. पण सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदी त्यांना का भेटतात? 'भिऊ नका, मी तुमच्या सोबत आहे' हे मोदी नेमकं कोणाला सांगत आहेत? त्यांनी हा धमकीवजा संदेश नेमका कोणाला दिला आहे?" असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले, "गद्दारीचा हा व्हायरस आता संपूर्ण देशात पसरला आहे. मोदींनी इतर पक्षांतून बाहेर पडणाऱ्या गद्दारांना हा संदेश दिला आहे का, की 'तुम्ही आमच्याकडे या, तुमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही'? ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती उरलेली नाही. गद्दारीचा हा व्हायरस लोकशाहीचा जीव घेत आहे. त्यामुळे हा लढा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांसाठी आहे. लोकशाही वाचवण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, ती आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

हप्ता थकल्यावर आता फायनान्स कंपनीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ऑनलाईन अन्नात आढळले जिवंत उंदीर अन् झुरळे; तुकाराम मुंढेंच्या FDA ची धाड, नामांकित स्टोअर्सचे परवाने रद्द

SCROLL FOR NEXT