Shiv Sena Thackeray leader faces arrest in ₹5.33 crore bank fraud 
महाराष्ट्र

Bank Fraud : ठाकरेंच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, माजी खासदारावर गुन्हा दाखल, बँक फसवणूक प्रकरणात अटक होणार

Shiv Sena Thackeray leader faces arrest in ₹5.33 crore bank fraud : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या ५.३३ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिलेदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

  • देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या ५.३३ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी उन्मेष पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल.

  • माजी खासदार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्याला कधीही अटक होण्याची शक्यता.

  • उन्मेष पाटील यांनी सर्व आरोप फेटाळत सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा दावा केला.

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामुळे ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का.

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Umesh Patil bank fraud case details and Devgiri Bank scam explained: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. कुठल्याही क्षणी उन्मेष पाटील यांच्यासह दोघांना अटक होण्याची शक्यता आहे. उन्मेष पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केल्याचं ते म्हणाले. दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिलेदाराला मोठा धक्का बसला आहे.

देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला आहे. बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलं त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा कुठलाही भागीदार नाही. मी जामीनदार होतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मला नंबर एकचा आरोपी करण्यात आलं. मी या कंपनीचा कुठलाही भाग नसताना राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला, असे उन्मेष पाटील म्हणाले.

गिरीश महाजन यांच्या कुटुंबाच्या नावाने बी. एच. आर. चे ॲसेट खरेदी केले जातात, ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात खरेदी केला जातात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. वरद इन्फ्रा चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे तसेच सुप्रीमो कंपनी टॅक्स, ॲसेट नाही, तरी शेकडो कोटीच्या जमिनी माफक दराने कशा घेतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का?, असा सवाल उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला.

वरद इन्फ्राला तीन-चार कोटीच्या व्हॅल्युएशन असलेल्या ॲसेट आधारावर याच बँकेने 12 कोटीचे कर्ज दिले त्यावर गुन्हा दाखल होत नाही. मी जामीनदार होतो कर्जाच्या पाचपट माझ्या प्रॉपर्टी अटॅच केल्या आहे. कर्जाच्या 10% व्हॅल्युएशन नसणाऱ्यांना दहापट कर्ज दिले जातं देवा भाऊ हा न्याय कुठला? जेव्हा मी बी.एच.आर. वर बोलतो, तेव्हा यांना झोमत आणि तीन दिवसात माझ्यावर गुन्हा दाखल होतो. इतक्या महिन्यांपासून माझ्यावर गुन्हा दाखल का झालं नाही, तीनच दिवसात पुन्हा कसा दाखल झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मंगेश चव्हाण, गिरीश महाजन, बँकेचे चेअरमन, बँकेचे एमडी, बँकेचे मॅनेजर, रिकवरी ऑफिसर यांचे CDR तपासावेत अशी मागणी उन्मेष पाटलांनी केली. मंगेश चव्हाण भाजपचे आमदार, गिरीश महाजन भाजपाचे मंत्री, देवगिरी बँकेचे चेअरमन भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहे. निवडणूक जवळ आली मी बोलायला लागलो, तीन दिवसात जो अनेक महिन्यात गुन्हा नव्हता तो गुन्हा होतो ही यांचे नीती आहे का? असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवादी पथकाची मोठी कारवाई; मुंब्र्यानंतर कुर्ल्यात छापेमारी, नेमकं काय सापडलं? VIDEO

Maharashtra Live News Update: दिल्ली स्फोटातील जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

Delhi Blast Video: दिल्ली स्फोटाचा पहिला VIDEO; लाल किल्ल्याजवळ सिग्नलवर कार आली अन् क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

Khaman Dhokla: घरच्या घरी बनवा सुरत स्टाईल मऊ , लुसलुशीत खमण ढोकळा

राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? VIDEO

SCROLL FOR NEXT