Uddhav thackeray on Shivsena Split saam tv
महाराष्ट्र

शिवसेना फुटणार याची कुणकुण मला होती, पण... ; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

uddhav thackeray big statement amid shiv sena split : शिवसेनेत ४ वर्षांपूर्वी मोठी फूट पडली. एकनाथ शिंदेंसह ४० आमदार त्यावेळी फुटले. त्याची कुणकुण मला आधीच लागली होती, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.

Nandkumar Joshi

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, काल उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्याला जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, असं ते या बैठकीत म्हणाले. चार वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली. मला त्याची आधीच कुणकुण लागली होती, असंही ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुंबईत मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी चर्चा केली. ज्याला जायचं आहे, त्याने खुशाल जावं. त्यांचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आज माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. तोपर्यंत सोसाले लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांना नक्कीच पश्चाताप होईल. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. पक्षात चार वर्षांपूर्वी मोठी फूट पडली. चाळीस आमदार फुटले. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वांना कुकळते ते मला माहीत नव्हते का? मला त्याची कुणकुण होती, पण मी कोणालाच बोललो नाही. कुणावरही दबाव टाकला नाही. त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल केल्या नाहीत. ज्यांना जायचे आहे, त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ आहे? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT