Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरेंच्या युतीत पवारांची एन्ट्री, पण महाविकास आघाडीचं काय? VIDEO

Maharashtra Political News : ठाकरे बंधूच्या युतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एन्ट्री होणार का? हा सवाल उपस्थित केला जातोय.. असे झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar, Yash Shirke

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय.. त्यातच आता ठाकरेंच्या युतीत पवारांची एण्ट्री होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय.. त्याला कारण ठरलंय संजय राऊतांच्या राज ठाकरे आणि पवारांसोबत सुरु असलेल्या बैठकांचा सिलसिला.. 10 दिवसात राऊतांनी राज ठाकरेंची 3 वेळा तर पवारांची 9 ऑक्टोबरला भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यामुळे राज्यात नव्या युतीच्या चर्चांना वेग आलाय.. मात्र या बैठकांमध्ये काय चर्चा झाली? त्याची माहितीच सुत्रांनी दिलीय....

युतीच्या प्रचाराचे मुद्दे कोणते असणारे? कॉमन मिनिमम प्रोग्रॅम काय असावा यावर चर्चा झाली.. ठाकरे बंधूंच्या युतीत नवा भिडू घ्यायचा का? यावरही चर्चा झाल्याची शक्यता.

या युतीच्या चर्चांदरम्यान मनसे नेते अमित ठाकरेंनी विभागवार विभाग अध्यक्षांच्या बैठका घेऊन चाचपणी सुरु केलीय.. आहेत. कोणत्या जागा मागायच्या? आपली बलस्थानं कोणती? याची चाचपणी सुरु केलीय...

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असं म्हणत राज ठाकरेंच्या मविआतील सहभागाला ब्रेक लावला.. मात्र त्याचवेळी प्रादेशिक पक्षांच्या एकीचे संकेत ठाकरेंच्या खासदारांनी दिलेत...

दुसरीकडे राऊतांनी शरद पवारांशीही चर्चा करून ठाणे आणि पुण्यात युतीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...खरंतर पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडीशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांविना सत्तेचं समीकरण साधलंय.

आता राष्ट्रीय पक्षांना बाजूला ठेऊन राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्यातले तीन प्रादेशिक पक्ष एकीची वज्रमूठ आवळून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेचं समीकरण साधणार का? आणि प्रादेशिक पक्ष एकत्रित आल्यास महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT