उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांच्यावर थेट निशाणा साधला.
"हेच हिंदू राष्ट्र अपेक्षित होतं का?" असा सवाल करत त्यांनी हिंदुत्वाच्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित केला.
आरएसएस आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
'भाजप इतर पक्ष फोडत जात आहे, पेपर फोडले जात आहेत. मंदिराच्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत, हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं का? तुम्ही कोणाच्या बाजुने आहात, असा सवाल करत मोहन भागवत यांचे हिंदुत्त्व हे ढोंगी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी आज केली.
ठाकरे गटाकडून नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले. रामनगरमधील राम मंदिरात रामरक्षा पठण आणि महा आरती केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनी संबोधित करताना भाजपसह राष्ट्र स्वंयसेवक संघावर जोरदार घणाघात केला. उद्धव ठाकरेंनी थेट आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला. आपण नागपुरात आहोत, तेथूनच मोहन भागवत यांना तुम्ही कोणत्या बाजुने उभे आहात? असा सवाल करत असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच त्यांचे हिंदुत्व ढोंगी असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपचं सरकारचे वागणं हे मोहन भागवत पाहत आहेत, त्यामुळे ते कोणत्या बाजुने आहेत, ते सांगावं. भाजप इतर पक्ष फोडत आहे. विद्यार्थ्यांचे पेपर फोडत आहे. इतकेच नाही तर मंदिरातील तिजोऱ्यादेखील फोडत आहेत. हेच हिंदू राष्ट्र मोहन भागवत यांना अपेक्षित होतं का? आमचं हिंदू हे नाही, आम्हाला रामराज्य हवं आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हिंदू राष्ट्र नको.
भागवत साहेब, तुम्ही बोलला होता, या देशातील मुस्लीम हे हिंदूच आहे, त्यामुळे हिंदूंनी २ ते ३ अपत्य जन्माला घालायला पाहिजे. मग ही आपत्या जन्माला घातली त्यांच्या मुलाच्या परीक्षेचे पेपर फुटले, त्यांचं काय करणार, आणखी अपत्य जन्माला घालून त्यांनाही चिरडणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
बाबरी मशिद पाडली तेव्हा फक्त शिवसैनिक होते, भाजपचे नेते पळून गेले. तेव्हा बाळासाहेबांनी हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर गर्व से कहो हम हिंदू है, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मंदिरासाठी अनेकांनी आंदोलन केलं, अनेकजण जेलमध्ये गेले, कारसेवकांनी त्यासाठी जीव गेला. त्यांच्या श्रद्धेसाठी मंदिर बनवलं. त्यामुळे मंदिर वही बनायेंगे कशाला लुटण्यासाठी? का असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीस यांनी आमची चेष्टा, टिंगल करण्याचे सोडून द्यावं, आधी हे सांगा तुम्ही रामरक्षा करणाऱ्याच्या बाजूने आहात की मंदिर लुटारूंच्या बाजूने,असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. वर्गाच्या मॉनिटर सारखं सांगू नका, रामरक्षा पाट आहे की नाही, रामाची रक्षा करण्यासाठी रामभक्तांना समोर यावं लागतं आहे, यापेक्षा दुर्दैव काय आहे' असा सणसणीत टोलाही लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.