Sanjay Raut press conference key statements Saam TV Marathi
महाराष्ट्र

Rajya Sabha : उद्धव ठाकरे खासदार होणार की आमदार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला

Shivsena Rajya Sabha Election Political Update : उद्धव ठाकरे राज्यसभेसाठी इच्छूक नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत जागेवरून रस्सीखेच सुरू असून ठाकरे पुन्हा विधानपरिषद निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Namdeo Kumbhar

Why Uddhav Thackeray is not contesting Rajya Sabha : राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उघडपणे दावा केला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांचे नाव पुढे केले जात आहे. आशातच उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या होत्या. ठाकरे कुटुंबातून पहिला खासदार होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे राज्यसभेसाठी इच्छूक नसल्याची माहिती राऊत यांनी दिली. त्याशिवाय ठाकरे विधानपरिषदेत आमदारकीच्या निवडणुकीत पुन्हा उतरू शकतात, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. त्याशिवाय राज्यसभेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे भाष्य केले. उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी अशी इच्छा व्यक्त केली नाही. पण त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं आणि सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करावं ही आमची इच्छा आहे. " संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे राज्यसभेसाठी नशीब अजमावणार नाहीत, हे स्पष्ट झालेय. पण ते राज्यातच कार्यरत राहतील. ते विधानपरिषदेत पुन्हा आमदारकीच्या रिंगणात उतरतील, हे स्पष्ट संकेत मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जून २०२६ मध्ये संपणार आहे. त्यानंतर पुन्हा ते रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यसभेसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही, अनेकांनी लावली फिल्डिंग -

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागा आहेत, त्यातील एक जागा मविआला मिळणार आहे. त्या एका जागेसाठी काँग्रेस, ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीही आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २० आणि काँग्रेसचे १६ आमदार आहेत. मविआकडे ४६ आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर राजन विचारेंचीही राज्यसभेसाठी फिल्डिंग लावली. विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानं अंबादास दानवेंकडूनही राज्यसभेसाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकसभेतील पराभवानंतर कोकणातील वर्चस्व टिकवण्यासाठी विनायक राऊतही राज्यसभेसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरेही राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे समजतेय.

राज्यसभेची जागा कुणाला सुटणार?

राज्यसभेच्या एका जागेसाठी आम्ही एकत्र येऊन चर्चा करू, असे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्पष्ट केलेय. महाविकास आघाडी एकत्र येऊन आम्ही चर्चा करणार आहोत. प्रत्येकाचा दावा आहे, पण आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडूनही दावा करण्यात आला आहे. काँग्रेसमधील ४-५ जण राज्यसभेवर जाणयासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना केले. दुसरीकडे शरद पवार यांनी एका जागेवर कोण जायचं, याचा निर्णय मविआने एकत्र येऊन घ्यावा असे म्हटलेय. त्यामुळे राज्यसभेची एक जागा मविआत कुणाकडे जाणार? यावर सस्पेन्स कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी आणि अमित शहांना केजरीवालांची माफी मागावी लागेल - संजय राऊत

Blood Pressure: BP च्या गोळ्या घेताना ही चूक करत नाहीत ना? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Accident News : भाजपच्या नेत्याचं अपघाती निधन, महिनाभरापूर्वीच स्वीकारली होती मोठी जबाबदारी

Rashmika-Vijay : रश्मिका - विजयनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दिली गुडन्यूज; 'तो' PHOTO आला समोर, चाहत्यांना मिळाला सुखद धक्का

Prajakta Mali: 'बाय बाय फोन...'; प्राजक्ता माळीचा 15 दिवस मोबईल बंद, नेमकं घडलंय काय?

SCROLL FOR NEXT