Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena  Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: मुंबईकडे वाकड्या डोळ्यांनी पाहाल तर...; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार

Political News: प्रत्येक कुटुंबाला हक्काची जागा मिळाली पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी धारावीपासून अदानींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

Ruchika Jadhav

Uddhav Thackeray:

गेल्या अनेक दिवसांपासून धारावीच्या पुनर्विकासाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. धारावीचा विकास झालाच पाहिजे. ज्या व्यक्ती तेथे राहतात त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काची जागा मिळाली पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी धारावीपासून अदानींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासह मुंबईची सद्य परिस्थिती आणि धारावी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी सरकार आणि आदांनी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "आदानी धारावीला बाहेर काढणार आहेत का? धारावीच्या पुनर्विकासाचा विषय फक्त धारावी पुरता मर्यादित राहिलेला नाही. हा संपूर्ण मुंबईचा प्रश्न आहे. धारावीला आज सोन्यापेक्षा जास्त भाव आलाय. त्यामुळे सगळ्यांची नजर धारावीवर आली आहे. धारावीतील नागरिकांना सर्व सुविधा मिळाली पाहिजे. त्यांना ४०० ते ५०० फूट जागा मिळाली पाहिजे.", असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

धारावी (Dharavi) प्रोजेक्टमध्ये २० टक्के सरकार आणि ८० टक्के अदानी असा फॉम्युला आहे. नियोजन शून्य विकासकामांमुळे प्रदूषण वाढलं आहे. मुंबईतील तीन महत्वाचे प्रकल्प अदानींना देण्यात आलेत. सरकारला या सर्व प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी शिवसेनेचा मोठा मोर्चा धारावितून अदानींकडे जाणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलं.

मुंबईकडे वाकड्या डोळ्यांनी पाहाल तर याद राखा

धारावीकरांना मी आवाहन करतो की, गुंडगिरी करून तुमच्याकडून कोणी घर बळकावत असेल तर आमच्याकडे या. मुंबई कुणालाही रिकाम्या पोटी झोपून देत नाही. प्रत्येकाला ती आसरा देते. त्यामुळे १६ तारखेला मी सर्वांना आव्हान करतो की मोर्चामध्ये सहभागी व्हा. मुंबईकडे वाकड्या डोळ्यांनी पाहाल तर याद राखा, हे सांगण्यासाठी १६ तारखेला मोर्चा काढला जाणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

पुढे मुंबईतील राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून देखील उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केलीये. मुंबईतील सर्व प्रकल्प अहमदाबाद, गुजरात आणि इतर राज्यांत पाठवले जातायत. मग मुंबईकरांनी करायचं काय? मुंबईकरांनी फक्त यांची धुनीभांडी करायची का? असा खरमरीत सवाल करत या सगळ्या प्रश्नांसाठी मी १६ तारखेला मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

PM Mudra Yojana: सरकारची जबरदस्त योजना! व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार २० लाखांचे लोन; पात्रता काय? वाचा

Today Winter Temprature : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला, पण नव्या वर्षाची सुरूवात कडाक्याची थंडीने होणार, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Karela Chutney Recipe : कडू कारल्याची चटपटीत चटणी, साध्या जेवणाची वाढेल रंगत

HBD Salman Khan : आखा बॉलिवूड एक तरफ और सलमान खान एक तरफ; भाईजानची जंगी बर्थडे पार्टी, सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू सर्वांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT