Uddhav Thackeray Thane Meeting Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Thane Meeting: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; ठाण्यात उत्तर भारतीयांसह शक्तिप्रदर्शन करणार

Maharashtra Politics: २२ जुलै रोजी उद्धव ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये.

साम टिव्ही ब्युरो

गिरीश कांबळे

Uddhav Thackeray News: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन दिवशीय विदर्भ दौरा केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं पुढील टार्गेट शिंदेंचा बालेकिल्ला आहे. येत्या २२ जुलै रोजी उद्धव ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. (Latest Marathi News)

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीये. त्यांनी मेळावे आणि विभागीय बैठकांना सुरुवात केली आहे. अशात ठाकरे गटाकडून 22 जुलैला ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला जाणार आहे. यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

सायंकाळी 7.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारे उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे (Thane) बालेकिल्ल्यात हा मेळावा घेण्याचे नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.

या आधी सुद्धा उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी जैन आणि गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. आता मुंबईतील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:विमानाच्या इंधन टाकीतून गळती; १६६ प्रवाशांनी भरलेल्या विमानाचं तात्काळ लँडिंग

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

SCROLL FOR NEXT