Uddhav Thackeray made fun of Devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech: 'कोरोनाची लस मोदींनी काढली'! उद्धव ठाकरेंनी भर सभेत दाखवला फडणवीसांचा तो Video

Shivsena Vardhapan Din 2023 News Updates: उद्धव ठाकरे म्हणाले, काही वेळा तर आम्ही राजकारणीच आमच्या भाषणातून लोकांना हसवत असतो. आमची हास्यजत्रा चालूच असते.

Chandrakant Jagtap

Uddhav Thackeray Latest News: शिवसेनाचा आज वर्धापन दिवस असून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दोन वर्धापन दिन सोहळे साजरे करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या भाषणाची खिल्ली उडवली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी आत्ता हास्य जत्रेत्या कलाकारांना भेटलो, त्यांना म्हटलं तुम्ही खरोखरच आम्हाला हसवण्याचे काम करता. काही वेळा तर आम्ही राजकारणीच आमच्या भाषणातून लोकांना हसवत असतो. आमची हास्यजत्रा चालूच असते. काल या राजकारणातल्या हास्यजत्रेचा एक प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी साजरा केला. नुसतं एवढं बोलल्याने तुम्ही हसताय, त्याने केलेला प्रयोग सांगितला तर तुम्ही आणखी हसाल, असे ते म्हणाले. (Breaking News)

यानंतर तो व्हिडिओ माझ्याकडे आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी माईकवर फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडिओ ऐकवला. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात, "आज आपण सर्व याठिकाणी एकत्र बसलोय, का बसू शकलो? याकरता बसू शकलो की कोव्हिडची व्हॅक्सिन मोदींनी तयार केली'. (Latest Political News)

व्हिडिओ ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय हेच कळत नाही. पाहा हास्यजत्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही घेतो. कोव्हिडची लस मोदींनी तयार केली, मग बाकिचे काय गवत उपटत बसले होते? हे असे सगळे अंधभक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे हे असे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं हे ठरवावं लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT