Nana Patole demand JPC Inquiry for 500 rupees notes fraud: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत ५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? असा सवाल केला आहे. तसेच याची जेपीसीकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आल्या. परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या.
म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, नाशिक, देवास आणि बंगलुरुच्या सरकारी छापखान्यात नोटा छापल्या जातात. नाशिक आणि देवास येथील नोटा छापणारे सरकारी छापखाने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारी छापखान्यातून नोटा थेट रिझर्व्ह बँकेकडे जातात आणि नंतर बाजारात चलनात येतात, ही प्रक्रिया आहे. (Breaking News)
मग या नवीन ५०० रुपयांच्या नोटा गायब कशा झाल्या? या कारखान्यात छापलेल्या नवीन ५०० रुपयांच्या नोटांमध्ये घोटाळा झाला असून तब्बल ८८ हजार कोटी रुपये गेले कुठे? हा गंभीर प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले.
'नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा'
राहुल गांधी यांनी नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे असे आधीच सांगितलेले आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या जुना नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. १६६० कोटी नोटा चलनात होत्या पण रिझर्व्ह बँकेत या जुन्या नोटा जमा झाल्या त्यावेळी २ लाख कोटी नोटा जास्तीच्या जमा झाल्या होत्या, अशी माहिती आहे. नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटा किती छापण्यात आल्या? रिझर्व्ह बँकेकडे यातील किती नोटा पोहचल्या? यासह जुन्या नोटांच्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. (Latest Political News)
'आदिपुरुष' चित्रपटावर बंदी घालावी..'
आदिपुरुष चित्रटातून श्रीराम आणि हनुमान यांचा अपमान करण्यात आला आहे. भाजपा हिंदुत्वाचे सरकार असल्याचा डांगोरा पिटते आणि श्रीराम, हनुमानाचा अपमान करणारा चित्रपट येतो पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद देण्यात आले आहेत. चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय? श्रीराम आणि हनुमानाचा अपमान करणाऱ्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. तसेच देवांचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंद घालावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.