Ajit Pawar News: सरकारचा पोरखेळ सुरू आहे, त्यापेक्षा जनतेची कामं करा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Ajit Pawar on Survey: शिवसेनेच्या सर्व्हेविषयी बोलताना अजित पवार यांनी सर्व्हेला काही अर्थ नसतो, यामुळे लक्ष विचलित होते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar on Survey
Ajit Pawar on Surveysaam tv
Published On

Ajit Pawar criticizes Shinde-Fadnavis government: शिवसेनेच्या सर्व्हेविषयी बोलताना अजित पवार यांनी सर्व्हेला काही अर्थ नसतो, यामुळे लक्ष विचलित होते अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जी जाहिरात दिली होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आनंद दिघे यांचे फोटो नव्हते. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे भाजपचे अनेक लोक दुखावले गेले होते.

हा पोरखेळ सुरू आहे - अजित पवार

या जाहीरातीमुळे भाजप नेत्यांमध्ये खतखद होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाहिरात दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये मंत्र्यांचे फोटो टाकले गेले, हा पोरखेळ सुरू आहे. हे असं काही करण्यापेक्षा जनतेच्या समोर असणारे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने करावे असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. (Breaking News)

Ajit Pawar on Survey
Washim Accident News: वाशिम-रिसोड मार्गावर भयानक अपघात; बोलेरो पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू

अजित पवारांनी सरकारला विचारला जाब

हे सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा 75000 उमेदवारांची सरकारी नोकर भरती करू असं सांगितलं होतं. मात्र आता त्यांना बंड करून एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांनी वर्षभरामध्ये किती लोकांना नोकऱ्या दिल्या? किती महागाई कमी केली? किती शेतकऱ्यांना न्याय देऊन आधारभूत किंमत मिळवून दिली? शेतकऱ्यांच्या किती समस्या सोडवल्या? यावर बोलायला पाहिजे असे म्हणत अजित पवारांनी प्रश्नांचा भाडिमार केला.

'विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील'

महाविकास आघाडी एकजूट राहावी अशा पद्धतीने तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. मी जेव्हा विरोधी पक्षनेता झालो, तेव्हा विधानसभेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यापैकी आमची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेता पद भेटलं आणि वरच्या सभागृहामध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेता पण भेटलं. त्यामुळे आता संख्या किती आहे याबाबत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील असे अजित पवार म्हणाले. (Latest Political News)

Ajit Pawar on Survey
Gita Press Awarded: गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं; काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

बावनकुळेंनी लोकांच्या समस्यांवर बोलावं - अजित पवार

बावनकुळे यांनी काय बोलाव हा त्यांचा अधिकार आहे. यांचा असा प्लॅन होता, तसा प्लॅन होता याला काही अर्थ नाही. पहिल्यांदा राज्यात प्रचंड बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या हे या प्रश्नावर त्यांनी बोलले पाहिजे. हे असं होणार होतं, तसं होणार होतं हे सांगून महागाई कमी होणार आहे का? खतांच्या किमती वाढल्या आहे. पाऊस येत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आहे. यावर तुम्ही बोललो पाहिजे. केंद्रात तुम्ही आहात, राज्यात तुम्ही आहात, या प्रश्नाची उत्तर दिली तर काही प्रमाणात समाजाला दिलासा मिळेल, असा टोला अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com