Uddhav Thackeray addressing Shiv Sena leaders, announcing the Marathwada farmers' march for relief and support. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आता उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार?

Uddhav Thackeray Farmers March Marathwada: अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत.. मात्र उद्धव ठाकरेंसाठी मराठवाडा इतका महत्वाचा का आहे? आंदोलनाचा एल्गार मराठवाड्यातून पुकारण्यामागचं राजकीय कारण काय?

Bharat Mohalkar

अतिवृष्टीने मराठवाड्यात हाहाकार माजवलाय. लाखो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेलय. जनावरं वाहून गेली आहेत.. शेतकरी पार कोलमडून पडलाय.. त्यातच उद्धव ठाकरेंनी आधी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचं सांत्वन केलं आणि आता शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाईसह कर्जमुक्तीची मागणी करत ठाकरेंनी रस्त्यावरच्या लढाईचा निर्धारच दसरा मेळाव्यातून केलाय...

खरं तर दसरा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठवाड्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.. 11 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मराठवाड्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.. त्याची रणनीतीच शिवसेना भवनमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आखण्यात आलीय.. मात्र ठाकरेंनी मराठवाड्याकडे लक्ष वळवण्यामागंचं कारण काय?

मराठवाड्यात भीषण ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र नाही. त्यामुळे मराठवाड्यात विरोधी पक्षाची स्पेस निर्माण झालीय... हिच संधी ओळखून ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठवाड्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रणनीती आखलीय..

खरंतर 1994 मध्ये विद्यापीठाच्या नामांतरानंतर मराठवाड्यात शिवसेना विस्तारत गेली... छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव वाढत गेला.. त्यातच 2014 मध्ये मराठवाड्यात शिवसेनेचे 13, 2019 मध्ये 12 आमदार निवडून आले... तर लोकसभा निवडणुकीत 8 पैकी 4 खासदार विजयी झाले.. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत 46 पैकी अवघ्या 3 जागाच पदरी पडल्या

एकेकाळी मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता.. आता या बालेकिल्ल्यातील बळीराजाच संकटात आहे.. त्यामुळे या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालून ठाकरेंना गमावलेला बालेकिल्ला मजबूत करण्यात यश मिळणार की ठाकरेंच्या मोर्चाआधीच सरकार वाढीव मदत जाहीर करुन मोर्चातील हवा काढून घेणार? हे बघणं महत्वाचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT