Uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; ६ खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकला

uddhav thackeray News : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. ६ खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकलाय.

Vishal Gangurde

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय

फुटीर खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता

ठाकरे गटाची बंडखोर खासदारांच्या वेगळा गटाला मान्यता न देण्याची मागणी

ठाकरेंचे खासदार फुटल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या ९ पैकी ६ खासदारांनी संसदेत वेगळा गट स्थापन केला आहे. ६ बंडखोर खासदार हे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मागील ५ वर्षांत उद्धव ठाकरेंना दुसर्‍यांदा पक्षफुटीचा झटका बसला आहे. आता ६ खासदारांना अपात्र करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकला आहे. ठाकरेंच्या ३ खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ६ खासदारांना वेगळा गट स्थापन करण्याची मंजुरी देऊ नये, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ठाकरेंचे ३ खासदार आणि लोकसभा अध्यक्षांची जवळपास भेटीत २० मिनिटे चर्चा केली. या बैठकीत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. फुटीर खासदारांच्या गटाला संसदेत मान्यता देऊ नका, अशी मागणी ठाकरे गटाने केली.

लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं की, 'आम्ही लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली. संविधानातील तरतुदीची अंमलबजावणी केली पाहिजे. फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता मिळू नये. संविधानाचा सन्मान ठेवून कारवाई केली पाहिजे'.

खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं की, 'लोकसभा अध्यक्षांना सांगितलं की, तुम्ही कोणत्या गटाला मान्यता देत असाल, तर आधी आमच्याशी चर्चा करा. कायद्यानुसार कोणताही गट दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. यासाठी संपूर्ण पक्ष विलीन करावा लागतो. लोकसभा अध्यक्षांनी फुटीर गटाला मान्यता देऊ नये'. तत्पूर्वी, बंडखोर खासदारांवर कारवाई व्हावी, यासाठी संजय राऊत हे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे फुटीर खासदारांवर काय कारवाई होईल, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea vs Coffee Time : सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? आताच थांबवा ही सवय; जाणून घ्या योग्य वेळ

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT