Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Karnataka Election Results: 'द्वेषमूलक राजकारणाला राहुल गांधींनी...; काँग्रेसच्या यशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंगेश मोहिते

Sushma Andhare News: कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत १३५ जागा जिंकत मोठा विजय प्राप्त केला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का दिला आहे. या कर्नाटकातील निवडणुकीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

सुषमा अंधारे म्हणाल्या, 'कर्नाटकमध्ये द्वेषमूलक राजकारणाला राहुल गांधींनी शांतपणे उत्तर दिलं आहे. हा देश शांतीप्रिय देश आहे. या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्ष म्हणून पहिली निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये नवा बदल आणि पायंडा पडलेला आहे'.

'भाजपबद्दलची जी नकारात्मकता वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा रोवला. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बाजार उठला आहे.कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 136 जागा मिळवल्याने भाजपची नकारात्मकता दिसून येत आहे,अशी टीका अंधारे यांनी केली.

अनिल जयसिंघनिया प्रकरणावर भाष्य करताना अंधारे म्हणाल्या, 'अनिल जयसिंघानी प्रकरण थंड झालं की काय? कारण अनिल जयसिंघानी प्रकरणांने डोकं वर काढल्यावर अमृता फडणवीस शांत झाल्या होत्या, ते प्रकरण शांत झाल्याने पुन्हा राजकीय वक्तव्य केले. त्या प्रकरणावर बोलण्याची गरज आहे म्हणजे पुढील सहा महिने अजून शांत बसतील'.

महाविकास आघाडीच्या बैठकीवर भाष्य करताना अंधारे म्हणाल्या, 'सिल्व्हर ओकला बैठक आहे. सध्याच्या वज्रमुठ सभा रद्द झाल्या, त्याचा तारखा ठरवण्यावर चर्चा होईल. कुरघोडी सुरू आहे. त्यावरही चर्चा होईल. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा केली तर कर्नाटक सारखा निकाल येऊ शकतो. या अंगाने सुद्धा मूलभूत प्रश्नांना निवडणुकीच्या काळात कायद्याने वर कसे आणावे यावर चर्चा होणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT