Karnataka Election Result 2023: कर्नाटकात भाजपची नामुष्की! बोम्मई सरकारच्या मंत्रिमंडळातील तब्बल 14 मंत्र्यांचा पराभव

Karnataka 14 cabinet ministers defeated: कर्नाटकच्या निकालात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बसवराज बोम्मई मंत्रिमंडळातील एक दोन नाही तर तब्बल 14 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Karnataka Assembly Election Result 2023
Karnataka Assembly Election Result 2023saam tv

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेसच्या झंझावातात सर्वच राजकीय पक्ष उद्ध्वस्त झाले. भाजपलाही दारुण पराभवाला समोरे जावे लागले. दक्षिणेतील एकमेव बालेकिल्लाही सत्ताधारी भाजपच्या हातातून गेला.

कर्नाटकात काँग्रेसने 136 जागा मिळवल्या तर भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली. याशिवाय जेडीएसला 19 आणि इतरांना 4 जागा मिळाल्या. या निकालात (Karnataka Election Result 2023) सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बसवराज बोम्मई मंत्रिमंडळातील एक दोन नाही तर तब्बल 14 मंत्र्यांना पराभवाचा (14 cabinet ministers defeated) सामना करावा लागला. यामुळे भाजपची नामुष्की झाली आहे.

Karnataka Assembly Election Result 2023
Karnataka Election Result 2023: कर्नाटकातच काँग्रेसच किंग! भाजपचा सुपडा साफ; येथे पाहा अचूक निकाल

या मंत्र्यांचा झाला पराभव

गोविंदा करजोल (मुधोळ), जेसी मधुस्वामी (चिकनईकानाहल्ली), बीसी पाटील (हिरेकरूर), शंकर पाटील मुनेना कोप्पा (नवलगुंड), हलप्पा आचार (येलबुर्गा), बी श्रीरामुलू (बेल्लारी), के सुधाकर (चिक्कबल्लापुरा), बीसी नागेश (तिप्तूर), मुरुगेश निरानी (बिलगी), बीसी पाटील (हिरेकरूर) आणि एमटी बी नागराज (होस्कोटे) या मंत्र्यांचा पराभव झाला. एवढंच नाही तर भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनाही सिरसी मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला.

याशिवाय मंत्री व्ही सोमन्ना वरुणा आणि चामराजनगर या दोन मतदारसंघातून निवडणूक हरले. या दोन्ही जागांवर त्यांनी निवडणूक लढवली होती. मंत्री आर अशोक यांनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पद्मनाभनगरमधून ते पुन्हा निवडून आले, पण कनकपुरा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाी कर्नाटकमधील विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन केले आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा", असं ट्वीट मोदींनी केले आहे. तसेच, "कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू, असेही ते म्हणाले आहेत.

कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली

कर्नाटक निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी आज महविकास आघाडीची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शरद पवार यांचे मुंबईतील निवास्थान सिल्वर ओकवर उद्या ही बैठक होणार आहे.

Karnataka Assembly Election Result 2023
Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघव चड्डाचा झाला साखरपुडा! दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले फोटोज

कर्नाटकचा संपूर्ण निकाल

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. (Latest Political News)

भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे. याशिवाय सुरुवातीला जनता दल सेक्यूलर या निवडणुकीत किंगमेकर ठरेल असे वाटत होते. मात्र नंतर त्यांच्याही जागा कमी झाल्या. जेडीएसला या निवडणूकीत कर्नाटकच्या जनतेने फक्त 19 जागांवर विजय मिळवून दिला. यामुळे भाजप आणि जेडीएसची पिछेहाट झाली आहे. इतर पक्षांना या निवडणुकीत 4 ठिकाणी विजय मिळाला आहे. एका जागेचा निकाल अद्याप बाकी आहे. तिथे भाजप आघाडीवर आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com