Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: ठाकरे गटाची ताकद वाढली; निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना मिळाला नवा साथीदार

Maharashtra Political News: शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा समाजवादी चळवळीतील संघटनांसोबत राजकीय वाटचाल करणार आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Political News:

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोमाने काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाने गेली अनेक दशके समाजवादी आणि धर्मनिरपेक्षवादी विचारांच्या पक्षांपासून राखून ठेवलेलं अंतर दूर केलं आहे. यामुळे आता शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा समाजवादी चळवळीतील संघटनांसोबत राजकीय वाटचाल करणार आहे. शिवसेना ठाकरे गट-समाजवादी जनता पक्षाच्या या युतीमुळे उद्धव ठाकरेंची राजकीय ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाची समाजवादी जनता पक्षासोबत युती झाली आहे. या शिवसेना ठाकरे गट-समाजवाद जनता युतीच्या जाहीर कार्यक्रमात आमदार कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा फुले पगडी, घोंगडी देऊन सत्कार केला.

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचा 'कुटुंब प्रमुख' असा उल्लेख केला.

कपिल पाटील म्हणाले, 'महाराष्ट्र आजही तुम्हाला कुटुंबप्रमुख मानतो. आता फोटो फ्रेम दिली, ती दिग्गज समाजवादी विचारांची आहे. त्यात प्रबोधनकार ठाकरे आहेत. अनेकांना माहीत नसेल. बाळासाहेब ठाकरे सेना उभी करत होते, त्यावेळी पहिली युती समाजवाद्यांशी केली होती'.

'परवा उद्धव ठाकरे यांनी बोलताना फोडाफोडीच्या राजकारणाचा इतिहास सांगितला. त्यानंतर तपशील देखील पाठवला. ठाकरे यांचं वाचन खूप बारीक आहे. आमच्या समाजवाद्यांच्या अनेक संघटना आहेत. आम्ही एकत्र नव्हतो, पण तुमच्यासाठी एकत्र आलो. लोकशाही वाचवायची आहे म्हणून एकत्र आलो, असे कपिल पाटील पुढे म्हणाले.

संजय राऊत यांची भाजपवर टीकास्त्र

खासदार संजय राऊत यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, ' कपिल पाटील यांनी सांगितलं की, आमच्या 21 वेगवेगळ्या संघटना आहेत. म्हणजे आपला पक्ष हा 21 वेळा फुटला आहे. तुम्हाला फुटण्याचा अनुभव जास्त आहे'.

'समाजवादी लोक त्या काळी बाळासाहेब ठाकरे यांना समजून घेऊ शकले नाहीत. ते आज उद्धव ठाकरे यांना समजून घेत आहेत. समाजवादी चळवळीसोबत वाद नाही, पण आम्हाला भांडणाची खुमखुमी आहे. देशाला समाजवादी चळवळीने दिशा दिली, असे ते म्हणाले.

'जेव्हा देशात संकटे आली. तेव्हा समाजवादी चळवळीतील लोकांनी समोर येऊन दिशा दिली. त्यावेळी संघ-भाजप कुठे होता माहीत नाही, पण समाजवादी चळवळीची नेते पुढे होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात संघ कुठे होता, असं विचारलं जातं. पण समाजवादी कुठे होते विचारलं जात नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT