Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शेतकरी आर्थिक संकटात, अजित पवारांची सभेसाठी लाखोंची उधळपट्टी; बीडमधील सभेवरून ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: अजित पवारांची सभा आणि बॅनरबाजीवरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

विनोद जिरे

Beed Politics: अजित पवारांच्या उद्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठी बॅनरबाजी अजित पवार गटाने केली आहे. या सभा आणि बॅनरबाजीवरून ठाकरे गटाने गंभीर आरोप केलाआहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी अजित पवारांच्या सभेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात त्यांच्यासमोर अनेक संकट उभी असताना सत्ताधारी आज लाखोंची उधळपट्टी करत खर्च करत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा विचार करून आज अजित पवार गटातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला आहे.

यावेळी ते म्हणाले, 'उद्या या ठिकाणी सभा होत आहेत. आता उद्धव ठाकरेंची सभा आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सभा घेत आहोत. कोरडा दुष्काळ जाहीर करा म्हणून आम्ही सभा घेत आहोत'.

'सत्ताधारी ज्या प्रकारची सभा घेत आहेत. त्यांनी विचार केला पाहिजे, लाखोंचा खर्च याठिकाणी करत आहेत. त्यांनी विचार केला पाहिजे, आज बीड जिल्ह्यातील शेतकरी पाऊस नसल्याने बेजार आहे. आज या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरज असून त्यांनी आता आत्मपरीक्षण करावं, असा टोला मारत अनिल जगताप यांनी अजित पवार गटातील नेत्यांना सल्ला दिला आहे.

अजित पवारांच्या होर्डिंगसाठी 18 कोटी रुपयांच्या मशीनने पाडले होल

बीडमध्ये आज अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची राज्यातील पहिली सभा होत आहे. यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वच मंत्रिमंडळ येत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यासाठी थेट 18 कोटी रुपयांच्या मुख्य महामार्गालाचं मशीनच्या माध्यमातून मोठमोठे होल पाडण्यात आले आहेत.

या कामामुळे या रस्त्याची लवकरच वाट लागण्याची शक्यता आहे. भविष्यात आज लहान दिसणारे हे होल रस्त्याला तडे जाण्याला देखील कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. यामुळे बीडकारांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT